top of page

योजक - शोधक : छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज! हे शब्द ऐकले की एक चैतन्य अंगामध्ये सहज संचारतं! इतिहासामध्ये शिवाजी महाराजांवर फक्त चौथ्या वर्गात आपल्याला विशेष माहिती आढळते . पण मुळात समग्र शिवाजी महाराज वाचणे हेसुद्धा प्रेरणादायी आहे!


बालमित्रांनो, आपल्याला मात्र पुस्तकात फक्त शिवाजी महाराजांनी किल्ले घेतले , त्या काळच्या मुगल राज्यांशी लढाई केली इतकीच माहिती फक्त दिली जात असेल .

शिवाजी महाराजांनी नुसते किल्ले घेतले नाही तर त्या किल्ल्यांची व्यवस्था सुद्धा कशी नीट शिकली हे बघण्यासारखे आहे. जेव्हा त्यांची आग्राहून सुटका झाली आणि ते परत येत होते, संन्यासी वेशात होते ,बऱ्याच ठिकाणी मुक्काम करणं भाग होतं कारण पायी प्रवास करणे चालू होतं त्यामुळे अनेक गाव बघितले अनेक लोकांशी भेटी झाल्या. तसेच एका म्हाताऱ्या बाईकडे एक दिवस विश्राम केला. भूक लागली आहे म्हणून तिला वाढायला सांगितलं. आणि त्या बाईनेही त्यांना माझ्याकडे फक्त भात आणि वरणच आहे असं सांगून त्यांना भात वरण वाढले. आता भात तिने केळीच्या पानावर दिला त्याच्यामुळे आता भातामधे आळण केल्यावर वरण वाढलं असतं तर सोपं गेलं असतं पण त्यांना ते माहित नव्हतं .तेव्हा त्या बाईने आळण करायला सांगून वरण वाढले व वाढता वाढता त्यांना उद्देशून म्हटलं "शिवाजी राजा दिसतोय तू"! आपल्याला ओळखले किती काय ? असे त्यांना वाटले. पण या बाईने ओळखले नाही याची खात्री झाल्यावर विचारलं," का? असं का म्हणालास की मी शिवाजीसारखा आहे म्हणून!" त्यावर तिने उत्तर दिले,"या शिवाजी राजाला गड जिंकता आले आणि एवढं साधं कळत नाही की त्याची व्यवस्था नीट करायला पाहिजे . मला सांगा भात घेतल्यानंतर भाताला मध्ये आळण केले आणि त्या खड्ड्यात वरण टाकलं तर हळूहळू भात घेऊन तो खाणे सोपं जाईल की नाही ? तसं शिवाजीनी नुसती गड घेतले पण गडाची तटबंदी मजबूत करायला पाहिजे, तिथे तोफा राखायला पाहिजे, त्याच्यातून किती पर्यंत तोफा डागल्या जाऊ शकतात? शत्रू कुठून येऊ शकतो ? त्या दृष्टीने तिथे काटेरी झाड कशी असायला पाहिजे ? या गोष्टी त्यांनी करायला नको का? ते काहीच केलं नाही. मग गड शिल्लक राहील का ? शत्रू त्या गडाला पुन्हा जिंकणार!" त्या बाईच सामान्य तत्वज्ञान एकूण शिवाजी महाराज आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी वापस आल्यानंतर ताबडतोब पहिली गोष्ट जर केली असेल तर ती म्हणजे गडाची तटबंदी मजबूत करण्याचे काम! शत्रू कसा येऊ शकेल ?कुठून येऊ शकेल ? त्याप्रमाणे प्रत्येक टोकावर तोफ किंवा काटेरी जाळ्या या गोष्टी कशा असतील? आणि इतकंच नाही तर अन्नधान्य किती प्रमाणात असेल? गड राखणा-या माणसांनी ते किती ठेवावं ? याचीसुद्धा अचूक माहिती काढून ती राहील याच्यासाठी ते निरीक्षण करणारे लोक तर त्यांनी नेमले. त्यांनी आपल्याकडे किल्ल्यांची खूप व्यवस्थित योजना तयार केली ज्याच्यामुळे शिवाजीं महाराजांना जिंकायला मोगल सत्तेला जवळ जवळ वीस वर्ष लढा द्यावा लागला . त्यांच्या दृष्टीने शिवाजीं महाराजांची फौज काहीच नव्हती. पण मोगलांच्या ताकतीपेक्षा शिवाजीं महाराजांची योजना इतकी सामर्थ्यशाली होती त्याच्यामुळे ते मुघलांच्या युद्धाला तोंड देऊ शकले .

शिवाजी महाराजांचा आणखीन एक गुण म्हणजे त्यांना माणसं कळायचे अगदी लहानपणाची गोष्ट आहे त्याकाळी पुण्यामध्ये जंगल हा प्रकार प्रचंड असल्यामुळे आजूबाजूला कोल्हे,लांडगे हे सगळे जीव प्रचंड असत आणि त्याच्यामुळे मनुष्यहानी होत असे राज्याला उपद्रव होत असे धान्याला उपद्रव होत असे. मग काय करायचं? तर सगळीकडे दवंडी पिटवली गेली की जो कोणी कोल्ह्याला किंवा तडसाला मारून त्याची शेपटी घेऊन येईल त्याला शिवाजी महाराज बक्षीस देतील. एक दिवस त्याप्रमाणे धना लोहार आला आणि त्याने सांगितलं की मी त्याला मारलं दोन-तीन होते पण त्यातल्या एकाला मारलं बाकीचे दोघं पळून गेले आणि त्याची शेपटी आणली. त्यांनी ज्या पद्धतीने वर्णन केलं ते वर्णन ऐकल्यानंतर अवघे सोळा वर्षाचे महाराज पण नजर कशी बघा ! त्याने ताबडतोब त्याला विचारलं," बक्षीस देतो पण समजा तुला काम दिलं तर चालेल का" लोहार हो म्हणाला ताबडतोब एक तलवार आणली आणि त्याच्या हातात दिली "हे तुझं बक्षीस !"त्यांनी तलवारीची धार बघितली आणि "रामपुरी दिसते" असा शेरा मारला आणि त्याच्या वरून त्याला लोखंडाची जाण किती आहे हे लक्षात आल्याबरोबर त्याला सांगितलं "माझ्याकडे काम करशील मोबदला म्हणून तू म्हणशील तो पगार मिळेल ", आणि ताबडतोब आपल्या सचिवांना सांगितलं की याला लोहार शाळा काढून द्या. दादोजी कोंडदेव म्हणतात," शिवबा असं कसा एकदम तुम्ही त्याला लोहारशाळा काढून द्यायला सांगितलं ?" त्यावर शिवाजी महाराज म्हणतात ,"पराक्रमी आहे, काहीही करण्याची व कष्टांची तयारी आहे आणि लोखंडाची अचूक पारख या तीनच गोष्टी लोहार शाळा सांभाळायला योग्य आहेत, नाही का? आणि निष्ठा ही नंतर तपासली जाऊ शकते मग काम द्यायला काय हरकत आहे?" शिवाजी महाराजांची ही नजर पारख बघून खुद्द दादोजी कोंडदेव सुद्धा थक्क झाले ! या अशा गोष्टी त्यांच्या चरित्राच्या आपण वाचायलाच हव्यात.

4 views0 comments
bottom of page